सुगम संगीताच्या ज्येष्ठ गायिका, ‘हेल्पर्स ऑफ हॅन्डीकॅप्ड’ या संस्थेच्या उपाध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या रजनी करकरे- देशपांडे यांचे शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास निधन झाले. ते ७४ वर्षांच्या होत्या. रजनी यांच्या निधनाने सुगम संगीत आणि दिव्यांगांच्या विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली.

रजनी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना ३ ऑगस्टपासून कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर सुरू असताना त्यांना फिट्सही यायच्या. अखेर फुफ्फुसाच्या विकाराने रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती पी.डी. देशपांडे आहेत. आज पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
34 Year Old Marries 80 Year Old Reel Star
८० वर्षांच्या रीलस्टारच्या प्रेमात महाराष्ट्रातील ३४ वर्षीय शीला झाली ‘दिवानी’; लग्नासाठी पार केले ६०० किमी अन् आता..

रजनीताई यांना वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओ झाला होता. पराकोटीच्या अपंगत्वावर मात करत त्यांनी संगीत क्षेत्रात नाव कमावले. तीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी आकाशवाणीच्या वेगवेगळ्या केंद्रांवरुन गायनाचे कार्यक्रम सादर केले.

वरात, हे दान कुंकवाचे, दैवत आदी सिनेमांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले असून ‘आनंदाचे डोही’ या त्यांच्या कार्यक्रमाचे एक हजारहून अधिक प्रयोग झालेत. १९८४ मध्ये नसिमा हुरजुक यांच्यासोबत त्यांनी ‘हेल्पर्स ऑफ दी हॅन्डीकॅप्ड’ या संस्थेची स्थापना केली. गेली ३० वर्षे त्या संस्थेच्या उपाध्यक्षा म्हणून काम पाहत होत्या. तसेच सुगम संगीताचे योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून त्यांनी कलांजली या संस्थेची स्थापना केली. गायक अभिजित कोसंबी, प्रसन्नजित कोसंबी, शर्वरी जाधव हे त्यांचे शिष्य आहेत.