News Flash

VIDEO: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टेम्पोला भीषण आग

टेम्पो मुंबईहून पुण्याला जात असताना ही आग लागली

लोणावळ्यात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टेम्पोला भीषण आग लागली आहे. सकाळी सात वाजता ही आग लागली होती. टेम्पो मुंबईहून पुण्याला जात असताना ही आग लागली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसंच आगीवर नियंत्रण मिळण्यात यश आलं आहे.

टेम्पो मुंबईहून पुण्याला जात असताना लोणावळ्याजवळ येताच त्यात अचानक आग लागली. टेम्पोला आग लागल्याने बांधकामासाठी वापरण्यात येणारं साहित्य, प्लास्टिक, लादी साफ करण्याचे केमिकल आणि इतर किंमती साहित्य जळून खाक झाले आहे. आगीमुळे काही वेळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला होता. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळण्यात यश आलं असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 9:45 am

Web Title: tempo caught fire on mumbai pune road in lonavla
Next Stories
1 गुंजवणी धरणासाठी १,३१३ कोटी
2 कमला नेहरू रुग्णालयाचा अतिदक्षता विभाग कुलूपबंद
3 डोळ्यांत पाणी!
Just Now!
X