News Flash

“ठाकरे सरकार अंतर्विरोधातून पडणार, आम्हाला ते पाडण्यात रस नाही”

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटबाबत माहिती नाही.

चंद्रकांत पाटील

महाविकास आघाडी सरकार त्यांच्या अंतर्विरोधामुळे पडेल, आम्ही ते पाडण्यात भूमिका बजावणार नाही, असं प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

पाटील म्हणाले, “आज संजय राऊत आणि देवंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांची भेट झाली की नाही याची मला माहिती नाही. राजकीय क्षेत्रात भिन्न विचारांचे भिन्न पक्षाचे लोक असे अधुनमधून भेटत असतात त्याचा अर्थ त्यात काही उद्देश आहे आणि त्यातून बातमी निर्माण होईल असं नाही. आज भाजपा कार्यकर्त्यांचं एक मोठं वेबिनार होतं, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते.”

“गेल्या नऊ महिन्यांत चर्चा सुरु आहे की हे सरकार जाणार आहे. या चर्चेमध्ये कधीही देवेंद्र फडणवीस, मी किंवा आमच्या कुठल्याच नेत्यांनी हे सरकार जाणार आणि आमचं सरकार येणार असं म्हटलेलं नाही. हे सरकार जाण्यासाठी आम्ही कुठलेही प्रयत्न करत नाही. मात्र, आम्ही म्हणतो की हे सरकार अंतर्विरोधामुळं पडेल, पण जेव्हा पडेल तेव्हा पडेल आम्ही ते पाडण्यात भूमिका बजावणार नाही.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 8:17 pm

Web Title: the government will fall due to internal contradictions we will not play a role in it says chandrakant patil aau 85
Next Stories
1 देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीमागे ‘हे’ आहे कारण
2 मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची मुंबईत भेट
3 भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड झाल्यानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Just Now!
X