06 March 2021

News Flash

राज्याचं करोनाबाधितांचं बरं होण्याचं प्रमाण ९४.७६ टक्क्यांवर

राज्यात आज ३,०८१ करोनाबाधित रुग्णांची वाढ

संग्रहीत

राज्यात आज नव्या करोनाबाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली असून हे प्रमाण ९४.७६ टक्क्यांवर पोहोचलं आहे. त्यामुळे राज्यात सध्या ५२,६५३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे.


आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, राज्यात आज ३,०८१ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर ५० जणांचा मृत्यू झाला. आज नवीन २,३४२ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण १८,८६,४६९ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण ५२,६५३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.७६ टक्के झालं आहे.

पुण्यात दिवसभरात आढळले २७३ रुग्ण, तिघांचा मृत्यू

पुणे शहरात दिवसभरात २७३ करोनाबाधित रुग्ण आढळले. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, ३४५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १, ७५, ९७३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १२३ करोनाबाधितांची नोंद झाली असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2021 8:42 pm

Web Title: the recovery rate of corona patients reached in maharashtra at 94 percents aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 नामांतरावरून ‘सामना’ : ठाकरे सरकार स्थिर आहे का?, बाळासाहेब थोरात म्हणतात…
2 कर्नाटक सीमा भागातील शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत…. – अजित पवार
3 हा ढोंगीपणा नाही तर काय आहे?; काँग्रेसनं शिवसेनेवर ताणला ‘बाण’
Just Now!
X