-रमेश पाटील

हळव्या वाणातील भात पिके कापणीस तयार झाली आहेत. ठिकठिकाणी पिवळ्या सोन्यासारखी शेती बहरली आहे. काही शेतकऱ्यांनी कापणीस सुरुवातही केली आहे. मात्र कापणी केलेल्या या पिवळ्या सोन्याला घरी आणण्यापुर्वीच परतीच्या पावसाने डल्ला टाकण्यास सुरुवात केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

यवतमाळमधील वाडा तालुक्यातील आज अनेक ठिकाणी झालेल्या तासभर पावसाने कापणी केलेल्या भाताची कडपे वाहून नेली आहेत. काही ठिकाणी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे कापणी केलेली कडपे संपूर्ण शेतात पसरली आहेत. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. कालपासून संध्याकाळी रोजच पडत असलेल्या या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.