बीड शहरामधील जिल्हा रुग्णालयामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयामधील वॉर्ड क्रमांत सहाच्या छतावरुन गुरुवारी मध्यरात्री दोन पुरुष आणि एका महिलेला अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडले आहे. रुग्णलयातील कर्मचाऱ्यांनी या तिघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मात्र या तिघांनाही केवळ वरवर चौकशी करुन सोडून देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सरकारी रुग्णालयामध्ये असा प्रकार झाल्यानंतरही पोलिसांनी या तिघांवर कोणतीही कठोर कारवाई न करता सोडून दिले आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या दोन इमारती असून एकामध्ये ओपीडी आणि प्रशासकीय कारभार पाहिला जातो तर दुसऱ्यामध्ये रुग्णांना दाखल करुन घेण्याची सोय आहे. याच इमारतीमधील वॉर्ड क्रमांक सहाच्या जिन्यावरुन दोन पुरुष आणि एक महिला मध्यरात्रीच्या सुमारास गच्चीवर गेले. मद्यधुंद अवस्थेमध्ये हे तिघे अश्लील चाळे करु लागले. हा प्रकार एका रुग्णालय कर्मचाऱ्याला समजताच त्याने सुरक्षा रक्षकांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर रुग्णालय कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक बॅटरी घेऊन गच्चीवर शोध घेण्यासाठी गेले असता त्यांना तिघे जण गच्चीवर अढळले. यापैकी एक पुरुष आणि महिला नग्न अवस्थेत होते. गच्चीवर काही दारुच्या बाटल्या, कंडोमची रिकामी पाकिटे आणि चादर अशा वस्तुही कर्चमाऱ्यांना सापडल्या. कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पहाटे चारच्या सुमारास पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. मात्र कोणाचीही तक्रार नसल्याचे सांगत पोलिसांनी वरवर चौकशी करुन या तिघांना सोडून दिले आहे.

dombivli aarogyam hospital
डोंबिवलीतील आरोग्यम रुग्णालयातील डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांना महिला रुग्णाच्या नातेवाईकाचे चावे
Assistant police officers son succeeds in UPSC examination
पिंपरी : सहायक फौजदाराच्या मुलाची ‘यूपीएससी’ परीक्षेत यशाला गवसणी
high court ask Questions to bmc and sent notice over Tragic Deaths of children in Wadala
दोन मुलांच्या मृत्यूचे प्रकरण: मुंबईत मानवी जिवाची किंमत काय? उच्च न्यायालयाचा महापालिकेला प्रश्न
chhagan bhujbal, armstrong company
भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीला जिल्हा बँकेकडून २६ कोटींचा लाभ, थकीत कर्जफेडीसाठी ‘ओटीएस’ योजनेत सहभाग

हे प्रकरण दाबण्यासाठी आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा रंगताना दिसत आहे. मात्र अटक करण्यात आलेल्या महिलेची यासंदर्भात कोणतीच तक्रार नसल्याने सर्वांना सोडून देण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी दोघे पुरुष हे कायम रुग्णालयाच्या आवारात दिसतात. ते खासगी वाहनचालक असून त्यांना रुग्णालयाची चांगलीच माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आवारातच अशा प्रकार केल्याचे बोलले जात आहे.