26 October 2020

News Flash

परभणीच्या शिवसेना आमदार संजय जाधवांना सक्तमजुरी

परभणीचे शिवसेना आमदार संजय जाधव यांना सरकारी कामात अडथळे आणल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने तीन महिने सक्तमजुरी आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तीन वर्षांपूर्वीचे महावितरणच्या

| July 13, 2013 06:49 am

परभणीचे शिवसेना आमदार संजय जाधव यांना सरकारी कामात अडथळे आणल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने तीन महिने सक्तमजुरी आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तीन वर्षांपूर्वीचे महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत केलेले भांडण आमदार संजय जाधव यांना चांगलेच भोवले आहे. शेतकऱयांसोबत महावितरण कार्यालयात गेलेल्या संजय जाधव यांची महावितरण अभियंत्यांशी बाचाबाची झाली होती. त्यातून संजय जाधव यांनी महावितरण अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. महावितरण अधिकाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याप्रकरणी जाधव यांच्यावर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यावर जिल्हा न्यायालयाने संजय जाधव यांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2013 6:49 am

Web Title: three month jail to parbhani shivsena mla sanjay jadhav
टॅग Mla
Next Stories
1 तुकोबांच्या दर्शनासाठी इंदापूरला चिंब पावसात दिवसभर रांग
2 वाढता वाढता वाढे.. सोहळा हा भक्तिचैतन्याचा..!
3 माउलींचा पालखी सोहळा बरड मुक्कामी
Just Now!
X