News Flash

गणपतीपुळेः कोल्हापुरातील तीन जण समुद्रात बुडाले

सुरक्षा रक्षक वेळीच धावून आल्याने चार जणांचे प्राण वाचले.

प्रतिनिधिक छायाचित्र

पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आलेल्या तिघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. तिघेही कोल्हापूर येथील रहिवासी आहेत. यातील दोघांचे मृतदेह सापडले असून, एकाचा शोध सुरू आहे. ही घटना शनिवारी पहाटे घडली.

काही तरुण-तरुणींसह काजल जयसिंग मचले (१८), सुमन विशाल मचले (२३) या कोकणात फिरायला आल्या होत्या. गणपतीपुळे येथील मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले होते. पाण्यात उतरल्यानंतर खोलीचा अंदाज न आल्याने एका तरुणासह काजल जयसिंग मचले, सुमन विशाल मचले हे तिघे समुद्रात बुडाले. तिघांचा शोध सुरू केल्यानंतर दोन्ही तरुणींचे मृतदेह सापडले असून बागडे आडनावाच्या तरुणाचा शोध घेण्यात येत आहे.

सुरक्षा रक्षक वेळीच धावून आल्याने चार जणांचे प्राण वाचले. बुडालेले तिघेही कोल्हापुरातील कसबा बावडा येथील राहतात आहेत. हे तिघेही मुळचे कर्नाटकातील असून कामानिमित्त कोल्हापुरात असल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 10:54 am

Web Title: three people drowned in the sea at ganapatipule bmh 90
Next Stories
1 समान नागरी कायद्याचा तो दिवसही दूर नाही – उद्धव ठाकरे
2 गिरणी कामगाराचा मुलगा बाळासाहेबांमुळेच मुख्यमंत्री झाला – नारायण राणे
3 बेकायदा सावकारी कर्जे माफ?
Just Now!
X