प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे राजपथावर आयोजित संचलनासाठी येथील ४८ महाराष्ट्र बटालियनच्या दोघांसह तिघांची निवड झाली आहे. राज्यातून केवळ आठ छात्रसैनिकांची या संचलनासाठी निवड करण्यात येते.
चितळे विद्यालयातील छात्रसेना अधिकारी आर. पी. सूर्यवंशी, न्यू सिटी हायस्कूलचा छात्रसैनिक परेश माळी, छत्रपती शिवाजी हायस्कूलचा हंसराज पाटील या तिघांची संचलनासाठी निवड झाली आहे. या तिघांना बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल टी. एन. सिन्हा, कर्नल डढानिया, सुभेदार मेजर शक्तीसिंह यांचे मार्गदर्शन लाभले आहे. न्यू सिटी हायस्कूलचे छात्रसेना अधिकारी एन. व्ही. नागरे, शिवाजी हायस्कूलचे ए. टी. गोरे यांनीही छात्रसैनिकांच्या निवडीसाठी परिश्रम घेतले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jan 2015 रोजी प्रकाशित
राजपथावरील संचलनासाठी धुळ्याच्या तिघांची निवड
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे राजपथावर आयोजित संचलनासाठी येथील ४८ महाराष्ट्र बटालियनच्या दोघांसह तिघांची निवड झाली आहे.
First published on: 26-01-2015 at 01:22 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three selected from dhule for rajpath paredes