News Flash

एक हजार मीटरचे अंतर अवघ्या सहा मिनिटात धावून पूर्ण

एशिया बुक ऑफ  रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ  रेकॉड्समध्ये या विक्रमाची नोंद करण्यात आली.

दीड वर्षांपासून आर्याने पूर्वतयारी सुरू केली होती. पोलीस कर्मचारी असलेल्या तिच्या वडिलांनी त्यादृष्टीने कसून तयारी करून घेतली होती. 

तीन वर्षीय चिमुरडीचा विक्रम

वर्धा : आर्या पंकज टाकोणे या तीन वर्षीय चिमुरडीने एक हजार मीटरचे अंतर अवघ्या सहा मिनिटात धावून पूर्ण करीत विक्रमाला गवसणी घातली आहे.

एशिया बुक ऑफ  रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ  रेकॉड्समध्ये या विक्रमाची नोंद करण्यात आली. पूलगाव येथे राहणाऱ्या आर्याने वध्रेतील गांधी पुतळा ते सेंट अ‍ॅन्थनी स्कूल या दरम्यानचे एक किलोमीटरचे अंतर सहा मिनिट व एका सेकंदात पार केले. इंडिया बुकसाठी हे अंतर धावण्यास आठ मिनिटे तर एशिया बुकतर्फे  सात मिनिटांचा वेळ आर्याला देण्यात आला होता. मात्र आर्याने हे अंतर त्यापेक्षाही कमी वेळात म्हणजे सहा मिनिटे एका सेकंदात पूर्ण करीत विक्रमाची नोंद केली. त्याची घोषणा संस्थेचे आयोजक डॉ. मनोज तत्त्ववादी यांनी केली.

दीड वर्षांपासून आर्याने पूर्वतयारी सुरू केली होती. पोलीस कर्मचारी असलेल्या तिच्या वडिलांनी त्यादृष्टीने कसून तयारी करून घेतली होती.

खासदार रामदास तडस यांच्या हस्ते तिला विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी अमरावतीत झालेल्या मॅरेथॉनमध्ये आर्या धावली होती. सर्वात लहान धावपटू म्हणून तिने पुरस्कार जिंकला होता.

यापूर्वी चीनमधील तीन वर्षीय बालकाने एक किलोमीटरच्या अंतराची शर्यत आठ मिनिटात जिंकल्याची नोंद आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 2:44 am

Web Title: three years old baby complete distance of one thousand meters in just six minutes zws 70
Next Stories
1 पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरला
2 करोना झालेल्या ५७ महिलांची प्रसूती
3 ‘२४ एचआरसीटी स्कोअर’ रुग्ण शासकीय रुग्णालयात करोनामुक्त
Just Now!
X