राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी पहाटे लवकर उठून पाहणी दौरा, बैठका आणि इतर राजकीय कार्यक्रम घेत असतात. आज त्यांनी यामागचं कारण सांगत हे गुण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून घेतले असल्याचं आवर्जून सांगितलं आहे. सकाळी लवकर उठण्याची सवय आमच्या चुलत्यांची (शरद पवार) यांची. ते 27 वर्षाचे असताना सकाळी सातला कामाला लागायचे. आज त्यांचं वय 80 वर्ष पूर्ण असून सकाळ पासून काम करत असतात अस अजित पवार यांनी सांगितलं.

अजित पवार म्हणाले की, सकाळी लवकर उठण्याची सवय आजोबांची नाही तर चुलत्याची लागली आहे. आम्ही जस बघतोय तस चुलते 27 वर्षाचे असताना सकाळी सातला कामाला लागायचे. रात्री दोनला आले तरी सकाळी सात ला काम सुरूच. आता वय वर्ष 80 पूर्ण झालं. तरी देखील आजही सकाळ पासून कस साहेब काम करत असतात, हे आपण पाहतो. शेवटी तुमच्यावर कसे संस्कार होतात त्यावर अवलंबून असतं. सकाळी कामाला सुरुवात केली तर वातावरण देखील स्वछ असतं. एक, उत्साह असतो अस अजित पवार म्हणाले.

Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Five cases filed against extortionist Vaibhav Deore three crore extortion from BJP office-bearer
खंडणीखोर वैभव देवरेविरुध्द पाच गुन्हे दाखल, भाजप पदाधिकाऱ्याकडून तीन कोटी खंडणी
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”

आणखी वाचा- “अजित पवार भेसळ करायला लागले असं व्हायचं आणि…” उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला बंद केलेल्या पेट्रोल पंपचा किस्सा

पेट्रोल भरणाऱ्यांनो नाउमेद होऊ नका, धीरूभाई अंबानी यांनी पेट्रोल पंपावर काम केलय
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनोख्या पद्धतीने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत पेट्रोल सोडणाऱ्यांनो तुम्ही नाउमेद होऊ नका. धीरूभाई अंबानी यांनी पेट्रोल पंपावर काम केलय. नंतर, देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले. आपल्याला सर्वात श्रीमंत नाही व्हायचं. पण, पुढं आपलं बर होईल अशा शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून अस म्हणत चांगलं काम करा असा सल्ला त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला.