News Flash

महाराष्ट्रात आज २३ हजार ६४४ रुग्ण करोनामुक्त, आत्तापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन दिली माहिती

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये २३ हजार ६४४ करोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ही १० लाख १६ हजार ४५० इतकी झाली आहे. दरम्यान २० हजार ४१९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला २ लाख ६९ हजार ११९ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ७६.९४ इतके झाले आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

मागील २४ तासांमध्ये ४३० मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर हा २.६६ टक्के इतका झाला आहे. आजवर ६३ लाख ७६ हजार ६७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३ लाख २१ हजार १७६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात १९ लाख ४५ हजार ७५८ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ३० हजार ५७१ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

आज नोंद झालेल्या एकूण ४३० मृत्यूंपैकी २२७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत अशी माहितीही आरोग्य विभागाने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 8:28 pm

Web Title: today newly 20419 patients have been tested as positive in the state also newly 23644 patients have been cured today says rajesh tope scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “ठाकरे सरकार अंतर्विरोधातून पडणार, आम्हाला ते पाडण्यात रस नाही”
2 देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीमागे ‘हे’ आहे कारण
3 मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची मुंबईत भेट
Just Now!
X