20 October 2020

News Flash

महाराष्ट्रात २३ हजार ५०१ रुग्णांना डिस्चार्ज, आत्तापर्यंत ८ लाख ५७ हजारांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त

मागील २४ तासांमध्ये ४२५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रात आज २३ हजार ५०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी बाधितांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. तर आत्तापर्यंत ८ लाख ५७ हजार ९३३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.२२ टक्के झाले आहे. मागील २४ तासांमध्ये महाराष्ट्रात २१ हजार ९०७ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ४२५ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५७ लाख ८६ हजार १४७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११ लाख ८८ हजार १५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८ लाख १ हजार १८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. तर ३९ हजार ८३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज २ लाख ९७ हजार ४८० अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यात आज २१ हजार ९०७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या ११ लाख ८८ हजार १५ इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या ४२५ मृत्यूंपैकी २५५ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १२२ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. इतर ४८ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीतले आहेत. असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2020 9:20 pm

Web Title: today newly 21907 patients have been tested as positive in maharashtra scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना करोनाची बाधा
2 वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक
3 …ही तर देवेंद्र फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी! – बाळासाहेब थोरात
Just Now!
X