News Flash

पतीला मारहाण करून आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार

दुचाकी थोडय़ा अंतरावर थांबवून आरोपींनी बैलबंडी अडवली आणि पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

प्रतीकात्मक छायाचित्र

पतीसोबत शेतातून घरी परत जाणाऱ्या आदिवासी महिलेवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ब्राम्हणवाडा थडीनजीकच्या परसोडा येथील नदीत घडली. आरोपींनी तिच्या पतीला मारहाण करून व महिलेला पळवून नेऊन हे दुष्कृत्य केले. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे.

पीडित महिला शुक्रवारी सायंकाळी पतीसह बैलबंडीतून शेतातून परतत होती. त्यावेळी आरोपी सोमदास ऊर्फ सोम्या श्रीराम कासदेकर, गेंदू बोकरे, स्वप्निल साबळे या तीन आरोपींनी त्यांचा दुचाकीवरून पाठलाग सुरू केला होता.

दुचाकी थोडय़ा अंतरावर थांबवून आरोपींनी बैलबंडी अडवली आणि पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी पीडित महिलेला उचलून परसोडा गावाजवळच नदीत नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याबाबत ब्राम्हणवाडा पोलिसांना माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी चौकशी सुरू केली आणि तीनही आरोपींना अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 5:16 am

Web Title: tribal woman gang raped in amravati district
Next Stories
1 प्रवीण दिवटे हत्याकांडात ‘ऑफीस बॉय’ला अटक, ८ जणांना ४ दिवसांची पोलीस कोठडी
2 वेलिंगकरांच्या बंडामुळे संघातील खदखद बाहेर
3 सोलापुरात भाजपची गुप्त बैठक
Just Now!
X