सिंधुदुर्ग-आंबोली घाटात ५०० फुट दरीत ट्रक कोसळला. हा अपघात सांयकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. ट्रकमध्ये कितीजण होते, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. दाट धुक्यामुळे व अंधार असल्यामुळे मदत कार्यात अडचण येत आहे. अपघातात जीवितहानी झाली किंवा नाही याची माहिती समजू शकलेली नाही. आंबोली घाटातील मुख्य धबधब्यापासून जवळच खोल दरीत ट्रक कोसळला.

हा ट्रक सावंतवाडी-आंबोली महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता. मुख्य धबधब्याच्या परिसरात समोरील वाहनाला बाजू देताना चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि संरक्षण कठडा तोडून तो थेट दरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याला सुरूवात केली. दरम्यान, या अपघातात जीवितहानी झाली किंवा नाही याची माहिती समजू शकलेली नाही.