News Flash

राज्यातील नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी ट्रस्टची स्थापना होणार

शासनाला अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

प्रातिनिधीक छायाचित्र

मुलुंडयेथील कालीदास नाट्यमंदीर येथे अस्तित्वात असलेल्या ट्रस्टच्या धर्तीवर राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिकामधील नाट्यगृहांची दुरुस्ती व देखभालीसाठी ट्रस्टची स्थापना करण्यात येणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातील सिने कलावंत, नाट्य व लोककलावंत यांना शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा याविषयासंदर्भात विधानभवनात बैठक पार पडली.

यावेळी नाटयगृहात चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन नाटयगृहाची पाहणी करावी, सर्व नाटयगृहातील स्वच्छतागृहात पाण्याची सोय करणे, नाटयगृहातील खिडक्या, जाळया, दारे, फर्शी दुरुस्ती कचरापेटी उपलब्ध आहेत किंवा नाही नाही इत्यादी बाबींची पाहणी करुन याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना दिले. तसेच नाटयगृहात आपत्तकालीन स्थितीत अधिकाऱ्यांचा दुरध्वनी क्रमांक नाटयगृहात दर्शनी भागात लावण्याच्या सुचनाही यावेळी देण्यात आल्या.

यावेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कलाकारांसाठी शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती सादर करण्यात आली. यावेळी नाट्यकलावंत आदेश बांदेकर, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, कार्यवाह सुशांत शेलार उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच अभिनेते भरत जाधव यांनी नाट्यगृहांच्या दुरावस्थेबाबत आपले मत व्यक्त केले होते. ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे भरतने एक फेसबुक व्हिडीओ करत त्याचा संताप व्यक्त केला होता. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये भरतच्या नाटकाचा प्रयोग सुरु होता. यावेळी नाट्यगृहातील एसी बंद होते. अनेक वेळा याविषयी तक्रार करुनही येथील प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे भरत जाधव प्रचंड संतापल्याचे पाहायला मिळाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2019 9:09 pm

Web Title: trust will be established to repair the theater in maharashta dr nilam gorhe jud 87
Next Stories
1 सत्तेत आल्यास भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण: अजित पवार
2 BLOG : शिवरायांच्या गडांची विटंबना करणाऱ्यांना चोपण्यात गैर काय?
3 लढाईच्या वेळी सोबत राहतो, तोच खरा कार्यकर्ता -जयंत पाटील
Just Now!
X