23 November 2019

News Flash

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्याला अटक

२५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आली आहे

झी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेते मिलिंद दास्ताने यांना पोलिसांनी अटक केली आहे. २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील चतुःश्रृंगी पोलिसांनी मंगळवारी अटकेची कारवाई केली. मिलिंद दास्ताने यांच्यासोबत त्यांच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. दोघांनाही न्यायालयात हजर केलं असता २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पीएनजी ब्रदर्सचे अक्षय गाडगीळ यांनी अभिनेते मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नीविरोधात चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली होती. तक्रारीत त्यांनी मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नीने आपल्या औंध येथील सराफी पेढीमधून सोने खरेदी केल्यानंतर बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप केला होता. ही रक्कम जवळपास २५ लाख रुपये इतकी आहे.

आपण वारंवार मागणी करुनही बिलाची रक्कम दिली जात नसल्याचं अक्षय गाडगीळ यांनी तक्रारीत म्हटलं होतं. यानंतर पोलिसांनी कारवाई करत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. अखेर मंगळवारी पोलिसांनी दास्ताने दांपत्याला अटक केली. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमुळे घराघऱात पोहोचलेले मिलिंद दास्ताने यांनी काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे. लय भारी चित्रपटातही त्यांची भूमिका होती.

First Published on June 18, 2019 7:00 pm

Web Title: tujhyat jiv rangla marathi actor milind dasatne arested pune police png brothers sgy 87
Just Now!
X