News Flash

पोलिसांना गुंगारा देऊन सांगलीत दोन आरोपी पसार

अंधाराचा फायदा घेत पोलिसांच्या तावडीतून पळ काढला

प्रातिनिधीक छायाचित्र

सांगली शहर पोलीस स्टेशनच्या आवारातून दोन आरोपींनी पलायन केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. अनिकेत कोतळे आणि अमोल भंडारे असे पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांना दमदाटी करुन पैसे उकळण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. तपासासाठी नेत असताना आरोपींनी पोलीस स्टेशनच्या आवारातून अंधाराचा फायदा घेत पोलिसांच्या तावडीतून पळ काढला. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ते पसार झाले. सांगली पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2017 12:40 pm

Web Title: two accused absconding to sangli police
Next Stories
1 आरक्षण बदलले तर सरकार बदलेल!
2 गुलाबी अळीचा यंदा कापसाला फटका
3 लिंगायत समाजाची नाराजी आणि पालकमंत्र्यांची कोंडी!
Just Now!
X