News Flash

मलकापूर येथे पाण्यात बुडून दोन मुलींचा मृत्यू

पोलिसांकडून पुढील तपास सुरु

संग्रहित छायाचित्र

लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात पाण्यात बुडून दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
मलकापूर शहरातील म्हाडा कॉलनीमधील कांचन बामंदे (१४), शुभांगी दुतोंडे (१०) व नेहा वानखडे (१२) या तीन मुली कपडे धुण्यासाठी उघडा मारूती मंदिर जवळच असलेल्या खदानवर गेल्या होत्या. त्यापैकी एका मुलीचा पाय घसरल्याने ती पाण्यात बुडाली, तर दोघींनी आपली मैत्रीण बुडत असल्याचे बघून तिला वाचवण्याचे प्रयत्न केले.

त्या दोघींचाही तोल जाऊन त्या पाण्यात पडल्या. परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. या घटनेत कांचन बामंदे व शुभांगी दुतोंडे या दोघींचा मृत्यू झाला, तर नेहा वानखडे हिला वाचवण्यात यश आले आहे. पोलिसांनी स्थानक युवकांच्या मदतीने दोन्ही मुलींचे मृतदेह खदानी बाहेर काढले. ते उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 9:22 pm

Web Title: two girls death in malkapur due to drown in water scj 81
Next Stories
1 करोना उपचारात होमिओपॅथी बेदखल
2 नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट उधळला, एक जहाल नक्षलवादी ठार
3 महाराष्ट्रात ६ हजार २३४ नवे करोना रुग्ण, १९८ मृत्यू
Just Now!
X