News Flash

पाणी साठलेल्या खड्ड्यात पडून दोन मुलींचा मृत्यू

खड्ड्यातल्या पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून दोन मुलींचा मृत्यू

Mumbai : यापूर्वी चेंबूरमध्ये जुलै महिन्यात कांचन नाथ या मॉर्निंग वॉकला गेल्या असताना त्यांच्या अंगावर नारळाचे झाड पडले होते. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यावेळी पालिकेने जोरदार वाऱ्यांमुळे झाड पडल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकली होती.

पिंपरी चिंचवडच्या चिखली भागात पाणी साठलेल्या खडड्यात पडून दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज संध्याकाळी ५  ते ६ च्या दरम्यान घडली आहे. पूनम राजवंशी आणि त्रियांशु राजवंशी अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,चिखली येथे गायरान असून त्या ठिकाणी नागपंचमी निमित्त झोका बांधण्यात आला होता.पूनम आणि त्रियांशु या मुली त्या ठिकाणी झोका खेळण्यासाठी सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास आल्या होत्या.

झोका खेळून झाल्यानंतर दोघीजणी पाण्यात खेळण्यासाठी गेल्या मात्र खड्डा हा पाच ते सहा फूट खोल होता, या खड्ड्याचा दोघींनाही अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला अशी माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे.विशेष म्हणजे या दोघींचं घरही शेजारीच आहे.

गायरान या ठिकाणी कामासाठी आलेल्या एका नागरिकाला ही बाब लक्षात आली, तेव्हा या दोन्ही मुलींना पाण्याबाहेर काढण्यात आलं ,त्यावेळी त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. दोघींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं मात्र पूनम आणि त्रियांशु या मुलींना उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या दोघीही मूळच्या बिहार येथील आहेत. त्यांचे आई वडील मोलमजुरी करून चरितार्थ चालवतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 11:35 pm

Web Title: two girls drawn in pothole at pimpri chinchwad
Next Stories
1 ‘होय, एकेकाळी माझ्यावर नक्षलवादाचा प्रभाव होता’
2 ५ लाख रूपयांच्या बनावट नोटा जप्त, एकाला अटक
3 उद्योगपतींना सहज कर्जमाफी देता, मग शेतकरी कर्जमाफीची चर्चा का?-शरद पवार
Just Now!
X