विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने तपासणी पथकं नियुक्त केली आहेत. येरमाळा महामार्गावर पथकं तैनात करण्यात आलेले आहे. दरम्यान, गुरूवारी पहाटे एक भरधाव कंटेनर तंबूत घुसला. या भीषण अपघातात दोन कर्मचारी जागीच ठार झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीत मतदारांना भुलवण्यासाठी पैसे आणि मद्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली असून, राज्यात सर्वत्र महामार्गांवर तपासणी पथकं नियुक्त केली आहेत. येरमाळा महामार्गावरील येडशीजवळ आयोगाचे एक पथक तैनात करण्यात आलेले आहे.
दरम्यान, गुरूवारी पहाटे वाहनांची तपासणी करत असताना अचानक एक भरधाव कंटेनर तपासणी पथकाच्या तंबूत शिरला. कंटेनरने उडवल्याने दोन होम गार्ड जागीच ठार झाले आहेत. दीपक नाईकवडी आणि जोशी अशी मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत.