News Flash

दुर्दैव ! ध्वजारोहणासाठी जात असताना अपघात होऊन दोन एनसीसी कॅडेट्सचा मृत्यू

दोघांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे

देशभरात ७० वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना लातूरमध्ये मात्र प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे. ध्वजारोहणासाठी दुचाकीवरुन महाविद्यालयाकडे जात असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन एनसीसी कॅडेट्सचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अहमदपूर जवळील काजगी हिप्परगा येथे ही घटना घडली.

अपघातात मृत्यू पडलेल्यांची नावे गोविंद दहिफळे आणि पूजा भोसले अशी आहेत. दोघे दुचाकीवरुम महात्मा गांधी विद्यालयाकडे चालले होते. सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघे एकाच रोडवरील रहिवासी असल्याने एकाच दुचाकीवरुन चालले होते. पूजा बीएच्या द्वितीय तर गोविंद प्रथम वर्षाला होता. त्यांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 3:16 pm

Web Title: two ncc cadets died in accident while going for flag hosting
Next Stories
1 साईभक्तांसाठी खुशखबर: IRCTC च्या वेबसाईटवर दर्शनासाठी तिकीट बुक करता येणार
2 प्रजासत्ताक दिनानिमित्त तिंरग्यात सजला विठुराया
3 कर्नाळा खिंडीत एसटी बस- कारचा अपघात; एक ठार, तीन जखमी
Just Now!
X