पाताळगंगा नदीत दोन लहान मुलींचा बुडून मृत्यू झाला. रोमा सोनकांबळे (वय ५) आणि प्रगती सोनकांबळे ( वय ३)अशी या दोघींची नावं असुन त्या सख्ख्या बहिणी आहेत. खोपोली येथील मुलगाव येथुन सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास या दोघी नदी पात्रात वाहून गेल्या होत्या.
रोमा व प्रगती आई वडिलांसह पुण्याहुन खोपोलीत नातेवाईकांकडे आल्या होत्या. सोमवारी सांयकाळी त्या पाताळगंगा नदीवर आंघोळीसाठी गेल्या होत्या. त्यांना पाण्यात खोलीचा अंदाज न आल्याने दोघीही वाहून गेल्या. या दुर्घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दल, पोलिस आणि अपघातग्रसतांच्या मदतीला या ग्रुपच्या सदस्यांनी मदत व बचाव कार्य सुरु केले. काही वेळातच दोघींनाही वाहत जाताना पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना पार्वती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र या दोघांचीही मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी खोपोली पोलिस अधिक तपास करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 24, 2019 9:15 pm