अवकाळी पावसाने रायगड जिल्ह्य़ाला झोडपून काढले आहे. जिल्ह्य़ात सरासरी २९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्य़ात सर्वाधिक पावसाची नोंद माणगाव येथे झाली असून येथे ६८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल तळा येथे ५८ मिमी, पोलादपूर येथे ३४ मिमी, श्रीवर्धन येथे ३४ मिमी, म्हसळा येथे २९ मिमी, महाड येथे २३ मिमी, पेण येथे २२ मिमी तर मुरुड येथे ३१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. खालापूर येथे २२ मिमी, तर कर्जत येथे १८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अलिबाग येथे गेल्या चोवीस तासांत १० मिमी पाऊस नोंदवण्यात आला आहे.अवकाळी पावासामुळे जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या आहेत.