बाह्य़रुग्ण सेवा विभागही सुरू

नाशिक : नाशिकरोड येथील प्रभाग क्र मांक १९ मधील गोरेवाडी येथे सुमारे २५ वर्षांपासून बंद असलेल्या महानगरपालिके च्या प्राथमिक आरोग्य केंद्रातीलही यानिमित्ताने धूळ झटकली गेली. या ठिकाणी लसीकरण केंद्र आणि बाह्य़रुग्ण सेवा सुरू करण्यात आली आहे. नगरसेवक संतोष साळवे, पंडित आवारे ,बाजीराव भागवत, नितिन खर्जुल यांच्या प्रमुख उपस्थितीत या सेवेला सुरुवात करण्यात आली.

करोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करणे गरजेचे झाले आहे. आपल्या परिसरात लसीकरणाची व्यवस्था असावी ही प्रत्येकीची इच्छा आहे. विशेषत्वाने ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी दूरच्या केंद्रावर जाणे त्रासदायक आहे. वय अधिक असल्यास ज्येष्ठांसमवेत घरातील एका सदस्यालातरी जावे लागते. लसीकरण जिथे सुरू असेलतिथे ज्येष्ठांना घेऊन फिरण्याची वेळ येते.

ही परिस्थिती लक्षात घेत अनेक वर्षांपासून बंद असलेले गोरेवाडीतील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याची आवश्यकता भासू लागली. यासाठी नगरसेवक संतोष साळवे यांनी महापालिके कडे सतत पाठपुरावा के ला. अखेर गोरेवाडीतील आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

या केंद्रात दररोज सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत बाह्य़रुग्ण विभागाच्या माध्यमातून विविध आजारावर उपचार के ले जाणार आहेत. तसेच या ठिकाणी दररोज लसीकरण करण्यात येणार आहे. सोमवारी प्राथमिक स्वरुपात १० नागरिकांना लस देऊन सुरूवात आली. यावेळी माजी नगरसेवक कन्हैया साळवे, प्रशांत खांदवे, केशव बोराडे ,कृष्णा सोनवणे आदी उपस्थित होते.