लो चली मै…अपनी देवर की बारात लेके…हे हम आपके है कौन चित्रपटातील गाणं आपण कित्येकदा ऐकलं असेल. माधुरी दिक्षित आणि सलमान खानला रेणूका शहाणेने दिलेल्या शुभेच्छा आपल्या आजही लक्षात आहेत. आता आपल्या जवळच्या व्यक्तीचे लग्न म्हटल्यावर त्या लग्नाबाबत आपल्याला असणारा उत्साह आणि या सोहळ्यात आपण केलेले सेलिब्रेशन सर्वांच्या कायमच लक्षात राहते. असाच एका वहिनीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये वहिनी आपला दिर आणि होणाऱ्या जावेचे डान्स करत जंगी स्वागत करत असल्याचे दिसत आहे. या वहिनींचे नाव आहे सखी थरवळ.

boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
man arrested for booking cab from Salman Khan house
गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानच्या पत्त्यावर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने बूक केली कॅब, एकाला अटक
Salman Khan was the bartender at Riddhima Kapoor wedding
रणबीर कपूरच्या बहिणीच्या लग्नात बारटेंडर होता सलमान खान; ऋषी कपूर त्याला म्हणाले होते, “तू निघ तिथून…”
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर

फेसबुकवर ९ लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून ११ हजारांहून अधिक जणांनी तो शेअर केला आहे. आगाऊपणा निव्वळ टाइमपास या फेसबुकपेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यावर १ हजारहून अधिक जणांनी कमेंटस केल्या आहेत. वहिनी असावी तर अशी अशी टॅगलाईन देत हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एक महिला आपल्या दिराच्या लग्नात त्याला आणि त्याच्या होणाऱ्या बायकोला स्टेजवर घेऊन जात असल्याचे दिसते. हा व्हिडिओ मुंबईतील असून त्याचे नेमके ठिकाण समजलेले नाही.

इतकेच नाही स्टेजवर गेल्यावर ती या नवरदेवाला आपल्याला नमस्कारही करायला लावते आणि त्यालाही आपल्यासोबत डान्स करायला लावते. त्यामुळे मोठ्या वहिनीचे आपल्या दिराबद्दल असणारे प्रेम यानिमित्ताने दिसले आहे. अशाप्रकारे वहिनीने आपला लग्नसोहळा खास बनविला तर तो उपस्थितांच्याही लक्षात राहीलच यात शंका नाही. चला तर मग पाहूया या अनोख्या वहिनीचा लग्नातला डान्स…