News Flash

शाळा गाठण्यासाठी गुडघाभर पाण्यातून विद्यार्थ्यांची पायपीट

वैद्यनाथ महादेव ठाकूर विद्यालयातील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या नशिबी सध्या हे हाल आले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

नितिन बोंबाडे

वाणगाव-कापशी रस्त्यावर रेल्वेच्या स्वतंत्र मालवाहतूक मार्गिकेसाठी खोदकामामुळे पाणीच पाणी

वाणगाव-कापशी रस्त्यावर रेल्वेच्या स्वतंत्र मालवाहतूक मार्गिकेसाठीच्या (फ्रेट कॉरीडोर) खोदकामासाठी खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. ते पावसाआधी बुजवले न गेल्याने त्यात पावसाचे पाणी साचून तळी बनली आहेत. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून चालत जाऊन शाळा गाठावी लागत आहे.

वैद्यनाथ महादेव ठाकूर विद्यालयातील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या नशिबी सध्या हे हाल आले आहेत.

वाणगाव रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळा गाठावी लागतेच, परंतु पावसाळ्यात  विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आली आहे. कापशी, कोमपाडा येथील महिलांना  पश्चिमेकडील दवाखान्यात जाण्यासाठी हाल होत आहेत. यात गर्भवतींना रेल्वेमार्गातून चालणे मुश्कील झाले आहे.

रस्त्याचे खोदकाम करण्यात आल्याने येथे खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे पाण्यातून वाट काढण्यासाठी दुचाकी थांबवाव्या लागतात मग पुढचा मार्ग चालावा लागतो, असे अनेक नागरिकांनी सांगितले.

शाळकरी मुलांना आणि वयोवृद्धांना हालांना सामोरे जावे लागत आहे. वाणगाव रेल्वे फाटक ओलांडून सत्येन्द्रभाई ठाकूर  वाणगाव हायस्कूल आणि कोमपाडा, कापशी गावाकडे जाणारा एकमेव रस्ता रेल्वेच्या स्वतंत्र मालवाहतूक मार्गिकेसाठी खोदण्यात आला आहे. रेल्वे फाटकाजवळ मुख्य रसत्यावर खडय़ात पाणी साचुन रस्त्याचा तलाव झाला आहे. त्यामुळे दुचाकी पलीकडे जाऊ  शकत नसल्याने विद्यार्थ्यांना रेल्वे फाटकात उतरुन तळे ओलांडण्याची कसरत करावी लागत आहे. रुग्ण तसेच गर्भवती मातांना दवाखान्यात जाण्यासाठी त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

याशिवाय  वैद्यनाथ ठाकुर हायस्कुल शाळेत येण्यासाठी  कोमपाडा येथील पर्यायी मार्गावरील नाल्याचे काम ठेकेदाराने अपूर्ण ठेवले आहे.

परिणामी विद्यर्थी शाळेत वेळेवर पोहोचू शकत नाहीत. तर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच खड्डय़ांत पाणी साचल्याने रेल्वे स्थानकात पोचण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा अवघड वाटेमुळे नोकरदारांना रेल्वे स्थानकात वेळेवर पोचता आले नसल्याचे गाऱ्हाणी  मांडत आहेत.

कोमपाडा येथे रस्ते ठेकेदाराच्या नावाचा फलक लावण्यात आला आहे .त्यावरील सविस्तर माहिती पुसून टाकली आहे. त्यामुळे समजायला मार्ग नाही . जाब  कोणाला विचारावा अशी परिस्थिति आहे.

सुनिल पऱ्हाड, स्थानिक डॉक्टर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 12:22 am

Web Title: vangaon kapshi water on street palghar abn 97
Next Stories
1 रोजच विषाक्त पाण्याचा पेला
2 ‘गावाकडे चला’ मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद
3 गावोगावी बियाणेमाफिया सक्रिय
Just Now!
X