News Flash

कोल्हापूर : सामूहिक योगासने, सूर्यनमस्कारांनी योग दिन साजरा

इचलकरंजी येथे मुख्य मार्गावर सर्वात मोठे योग प्रात्यक्षिक; योग प्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

कोल्हापूर : सामूहिक योगासने, सूर्यनमस्कारांनी योग दिन साजरा

आंतरराष्ट्रीय योग दिन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रविवारी सकाळी विविध योग विषयक विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. योगासने, सूर्यनमस्कार असे सामूहिक प्रकार करण्यात आले. त्यामध्ये योग प्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

इचलकरंजी येथे योग दिनानिमित्त मुख्य मार्गावर सर्वात मोठे योग प्रात्यक्षिक करण्यात आले. राजर्षी शाहू महाराज पुतळा ते झेंडा चौक अशा सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर जागतिक योग दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता .राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने आयोजित केलेल्या या उपक्रमामध्ये चार योग मंडळ सहभागी झाले होते.

यावेळी ताडासन, उत्कटासन,अर्धकटीसन, त्रिकोणासन, वीरभद्रासन अशी पाच योगासने करण्यात आली.त्यानंतर पाच सूर्यनमस्कार घालण्यात आले. अखेरीस ‘भारत माता की जय’ असा जयघोष करीत सांगता करण्यात आली, असे शाहू पुतळा शाखेचे संचालक रमेश खंडेलवाल यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2020 8:31 am

Web Title: various activities on the occasion of yoga day in kolhapur msr 87
Next Stories
1 फसवणूक करणारा बडतर्फ सैनिक जेरबंद; ४ दिवसांची कोठडी
2 नगर शहरासह जिल्ह्यात सहा नवे करोना रुग्ण
3 ‘त्या’ काळात फडणविसांच्या बंगल्यात थांबून थोरात काय करत होते – विखे
Just Now!
X