मदन पाटील-विशाल पाटील यांच्यात सवतासुभा

सांगलीच्या राजकारणात मातब्बर समजल्या जाणाऱ्या वसंतदादा घराण्यातच दुहीची बीजे निर्माण झाली असून यातूनच महापालिकेच्या राजकारणात मदन पाटील आणि विशाल पाटील गटाचा सवतासुभा निर्माण झाला आहे. या पाश्र्वभूमीवर कदम गटाची दादा घराण्यातील धाकटी पाती म्हणून ओळख असलेल्या मदन पाटील घराण्याशी सोयरीक जुळल्याने राजकीय क्षेत्रातही याचे पडसाद उमटत असून याची पहिले लक्ष असलेली विधान परिषद कदम गटाने जिंकली असली तरी बाजार समिती, महापालिका यांमधील सत्ताकारण फुटीच्या उंबरठय़ावर पोहोचले आहे.

वसंतदादांच्या घराण्यातील सत्तासंघर्ष!
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
MLA chandrakanat Patil is upset as Eknath Khadse will return to BJP
खडसे भाजपमध्ये परतणार असल्याने आमदार पाटील अस्वस्थ

जिल्हय़ात काँग्रेसअंतर्गत असलेली गटबाजी नवीन नाही. स्व. मदन पाटील यांनी घरातील संघर्ष उंबऱ्याच्या आत ठेवत खासदारकी, कारखाना थोरल्या पातीकडे म्हणजे प्रतीक पाटील व विशाल पाटील यांच्याकडे आणि आमदारकी व महापालिका आपणाकडे असा अलिखित समझोता केला होता. शहराच्या राजकीय क्षेत्रात मदनभाऊंचा शब्द प्रमाण मानला जात होता, तो कार्यकर्त्यांच्या असलेल्या फळीमुळेच. मात्र मदनभाऊंच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली पोकळी आपल्या वारसा हक्काने भरून काढण्याची तयारी विशाल पाटील यांनी चालविली आहे.

मदन पाटील यांच्या पश्चात दादा घराण्याचा एकसंध वारसा थोरल्या पातीकडे येईल असा होरा होता. मात्र महापालिकेतील भाऊ गटाने श्रीमती जयश्रीवहिनींच्या नेतृत्वाखाली सवतासुभा कायम ठेवल्याने थोरल्या पातीच्या मनसुब्यांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने हा गट अस्वस्थ आहे. जिल्हा बँक निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांनी मदन पाटील यांचा पराभव करीत संचालकपद पटकावले.

बाजार समिती निवडणुकीमध्ये कदम गटाच्या साथीने मदन पाटील यांची राष्ट्रवादीशी झालेली जवळीक मोडीत काढण्याचे प्रयत्न केले.

मात्र, या थोरल्या आणि धाकटय़ा पातीच्या संघर्षांत भाऊ गटाला सध्या नव्या सोयरिकीने कदम गटाचे पाठबळ मिळाले आहे. येत्या १८ डिसेंबरला डॉ. कदम यांचे बंधू आ. मोहनराव कदम यांचे नातू डॉ. जितेश यांचा मदन पाटील यांच्या कन्या मोनिका यांच्याशी विवाह होत आहे.

दादा गटातील मदन पाटील यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी दूर करण्याबरोबरच सोनसळमधील नेतृत्वाची संभाव्य भाऊबंदकी दूर करण्याचा दुहेरी हेतू कदम गटाचा आहे. या निमित्ताने कदम गटाला महापालिका क्षेत्रातही राजकीय भवितव्य दिसत आहे. या दृष्टीनेच या लग्नसोहळ्याकडे पाहिले जात आहे.