News Flash

औरंगाबादमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या चौघांना गाडीने उडवले

केंब्रिज शाळेजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.

Road accident: या अपघातानंतर वाहनचालक गाडी घटनास्थळी सोडून फरार झाला. सर्व मृतदेह श्वविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात नेण्यात आले आहेत.

औरंगाबादमध्ये शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना भरधाव वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात चार जण जागीच ठार झाले. जालना रोडवरील केंब्रिज शाळेजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. भागीनाथ लिंबाजी गवळी (वय ५६), नारायण गंगाराम वाघमारे (वय ६५),दगडुजी बालाजी ढवळे (वय ६५), अनिल विठ्ठलराव सोनवणे (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण औरंगाबादमधील चिकलठाना परिसरातील हनुमान चौक येथील रहिवाशी होते. या अपघातानंतर वाहनचालक गाडी घटनास्थळी सोडून फरार झाला. सर्व मृतदेह श्वविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात नेण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 9:39 am

Web Title: vehicle crash four people going for morning walk in aurangabad
Next Stories
1 उजनी, वीरच्या विसर्गामुळे चंद्रभागेला पूर
2 निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा नांदेड विरुद्ध लातूर वादाला फोडणी!
3 सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न ऐरणीवर!
Just Now!
X