28 February 2021

News Flash

विजू मामांनी गाजवलेली ‘ही’ नाटके माहित आहेत का ?

चित्रपटामध्ये दर्जेदार काम करणाऱ्या मामाचं अभिनयावर अतोनात प्रेम.

‘मोरूची मावशी’ या नाटकातील ‘मावशी’ अजरामर करणारे, रंगभूमीसोबतच चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून रसिकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे शुक्रवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. ४० वर्ष चित्रपटसृष्टीमध्ये आपला ठसा उमटविणाऱ्या विजय मामांनी आजवर अनेक नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यातील काही नाटकं तर तुफान गाजली.

चित्रपटामध्ये दर्जेदार काम करणाऱ्या मामाचं अभिनयावर अतोनात प्रेम. त्यांच्या याच प्रेमापोटी ते प्रत्येक भूमिका जगत आले. आतापर्यंत त्यांनी जवळपास ३५० ते ४०० चित्रपटांमध्ये भूमिका साकारली. विशेष म्हणजे त्यांची मोरुची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटके प्रचंड गाजली.

विजू मामांनी अनेक नाटकांमधून प्रेक्षकांच मनोरंजन केल्याचं पाहायला मिळालं. ‘मोरूची मावशी’, ‘श्रीमंत दामोदरपंत’, ‘तू तू मी मी’, ‘अशी ही फसवा फसवी’, ‘नवरा म्हणू नये आपला’, ‘ती तिचा दादला आणि मधला’ ही नाटके त्याकाळी प्रपंड गाजली, विशेष म्हणजे आजही या नाटकांमुळे प्रेक्षक खळखळून हसताना दिसून येतात.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते विजय चव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

दरम्यान, नाटकांप्रमाणेच त्यांनी अनेक चित्रपटामध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली त्यामुळेच त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आलं होतं. २०१७ चा ‘संस्कृती कलादर्पण’च्या जीवनगौरव पुरस्कार आणि व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2018 12:09 pm

Web Title: veteran marathi actor vijay chavan famous drama
Next Stories
1 विजय चव्हाण यांच्या निधनाने महाराष्ट्राने अष्टपैलू अभिनेता गमावला- विनोद तावडे
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 एकाच व्यक्तीकडून गौरी लंकेश आणि दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण – सूत्र
Just Now!
X