News Flash

वर्धा : डॉ. गगने यांची भारत सरकारच्या फेलोशिपसाठी निवड

सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थानचे अधिष्ठाता आणि पॅथॉलॉजीचे प्राचार्य

वर्धामधील सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थानचे अधिष्ठाता आणि पॅथॉलॉजीचे प्राचार्य नितीन गगणे यांची भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्स (इंडिया) द्वारा अॅकॅडमी ऑफ मेडिकल सायन्स फेलोशिपसाठी निवड करण्यात आली आहे.

फेलोशिप आणि स्क्रोलच्या पुरस्कारासाठी औपचारिक प्रवेश २१ एप्रिल रोजी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्ध यांच्या हस्ते होणार आहे.

नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्स (इंडिया) ची स्थापना १९६१ मध्ये झाली आणि त्याचे उद्घाटन भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले. १९६३ पासून निवडक व्यक्तींना आढावा प्रक्रियेद्वारे आणि सर्व सदस्यांकडून अंतिम मतदानाद्वारे फेलोशिप दिली जाते. वैद्यकीय शास्त्राचे आणि देशातील सर्व भागातील विविध विषयांचे प्रतिनिधित्व करतात. सध्या देशभरातून ९०० फेलो आहेत आणि त्यात कुलगुरू, राष्ट्रीय महत्त्व असणारे संस्था प्रमुख, एम्स, प्रख्यात क्लिनिक यांचा समावेश आहे.

दरवर्षी २० ते २५ नवीन सहकारी निवडले जातात. सध्या महाराष्ट्रातून ५८ फेलोशिप आहेत. त्यापैकी विदर्भातील डॉ. सुधीर बाभुळकर, डॉ. शोभा ग्रोव्हर आणि डॉ. बी. एस. गर्ग असून महाराष्ट्रातील नामवंत फेलोशिपमध्ये डॉ. स्नेहलता देशमुख, डॉ. अदवाणी, डॉ. उदवाडिया, डॉ. भूषण पटवर्धन, डॉ. मृदुला फडके, डॉ. बी.के.गोयल. डॉ. नितीन गंगाणे हे यावर्षी दाखल झालेल्या फेलोशिप अनुयायांपैकी एक आहे. कोविडच्या परिस्थितीमुळे मागील वर्षी प्रवेश होऊ शकला नव्हता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 9:59 pm

Web Title: wardha dr gagne selected for government of india fellowship msr 87
Next Stories
1 Coronavirus – राज्यात दिवसभरात ५६ हजार २८६ करोनाबाधित वाढले, ३७६ रूग्णांचा मृत्यू
2 चंद्रपूर – करोना नियमावलीचे सर्रास उल्लंघन करणाऱ्यांवर हॉटेल, लॉन, क्लासेसवर दंडात्मक कारवाई
3 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Just Now!
X