विदेशी दारूच्या बाटलीत गावठी दारू भरून विकण्याचा अफलातून प्रकार प्रथमच दारूबंदी  असलेल्या वर्धा जिल्ह्यात आढळून आला आहे.

जिल्हा पोलिसांचे सध्या वॉश आऊट धाड सत्र सुरू आहे,,यापूर्वी विविध धाडीत लाखो रुपये किमतीची दारू नष्ट करण्यात आली आहे. मात्र आजच्या धाडीत नवाच प्रकार उजेडात आला, सुकळी नदी शिवारात मोहा दारू भट्ट्या आढळल्या, तसेच सडवा, ड्रम व अन्य साहित्याबरोबचच रिकाम्या बाटल्यांचा खच पडून होता. त्यात गावठी दारू भरून विकल्या जात असल्याचे स्पष्ट होते. तसेच हिंगणी शिवारात आठ लोखंडी ड्रममध्ये दारू साठा मिळाला.
पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई झाली, मात्र या घटनेत विदेशी दारूच्या बाटल्या  सापडल्याने चर्चेला पेव फुटले आहे.