News Flash

पाणीटंचाईच्या प्रश्नावर जलक्रांतीचे औषध

पाण्याचे भीषण दूर करण्यासाठी 'रायगडची जलक्रांती..

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पाण्याचे भीषण दूर करण्यासाठी रायगडची जलक्रांती..

रायगड जिल्ह्य़ात असलेले पाण्याचे भीषण दूर करण्यासाठी ‘रायगडची जलक्रांती..एक प्रयत्न’ असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. जिल्ह्य़ात बेसुमार पाऊस पडूनही नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते. टंचाई कृती आराखडय़ाच्या रकमेवरून ते स्पष्ट दिसून येते. यावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून जलक्रांती हा विशेष प्रकल्प २०१९ पर्यंत राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पात जनतेचाही सहभाग अपेक्षित असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

पाणीटंचाईच्या झळा कमी करण्यासाठी ६ कोटी २५ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडय़ाला मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामध्ये ३७६ गावे आणि एक हजार १०९ वाडय़ा, अशा एकूण एक हजार ४७६ योजनांचा समावेश आहे. जिल्ह्य़ातील १२६ गावे आणि ३८६ वाडय़ांमध्ये तब्बल ५१२ िवधण विहिरी (बोअरवेल) खोदण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रशासन २ कोटी ५६ लाख रुपये खर्च करणार  आहे.

अलिबाग, महाड आणि पोलादपूरमध्ये प्रत्येकी ५७ बोअरवेल खोदण्यासाठी ८७ लाख रुपये खर्च होणार आहेत. याच तीन तालुक्यांमध्ये टँकरनेही पाणीपुरवठा करण्यासाठी एकत्रित १ कोटी २७ लाख ५० हजार रुपये खर्च होणार आहेत. इतर तालुक्यांच्या

तुलनेमध्ये या तीन तालुक्यांवर अधिक खर्च होणार आहे. याच तालुक्यामध्ये जलक्रांतीसाठी विशेष प्रयत्न प्रशासनाने केले आहेत. अन्य तालुक्यांमध्येही जलक्रांतीच्या माध्यमातून जलयुक्त शिवार, तलावातील गाळ काढणे, वृक्ष लागवड करणे, असे कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. यासाठी विविध संस्थांमार्फत कोटय़वधी रुपयांचा सीएसआर फंडही प्रशासनाच्या तिजोरीत जमा झालेला होता. पाण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत असतानाही पावसाचे प्रचंड प्रमाणातील पाणी अडविण्यात म्हणावे तसे यश आलेले दिसून येत नाही. त्यामुळेच प्रशासनाला डिसेंबरअखेर टंचाई कृती आराखडा आखून पाण्याचे दुíभक्ष दूर करावे लागते.

पेण तालुक्यातील खारेपाट विभागासह म्हसळ्यामध्ये यंदा पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अन्य तालुक्यांतही थोडी अधिक पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यासाठी टंचाई कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्या माध्यमातून टंचाईवर मात करता येणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले होते .ही जमेची बाजू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 1:44 am

Web Title: water scarcity water shortage
Next Stories
1 भाजपा सरकारच्या निषेधार्थ आसूड मोर्चा – बच्चू कडू
2 ‘काँग्रेसमुक्त सांगली’च्या दिशेने प्रवास
3 भाजपचा काँगेसशी, सेनेचा राष्ट्रवादीशी घरोबा
Just Now!
X