News Flash

दुर्दैव…! आठवडयाभराने भरलेल्या पाण्याच्या हौदात बुडून मुलाचा मृत्यू

कोकणवाडी परिसरात अवघ्या अडीच वर्षाच्या बालकाचा अचानक तोल गेल्याने पाण्याने भरलेल्या हौदात बुडून मृत्यू झाला. वेद शहाणे असं दुर्दैवी मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

औरंगाबाद शहरातील कोकणवाडी परिसरात अवघ्या अडीच वर्षाच्या बालकाचा अचानक तोल गेल्याने पाण्याने भरलेल्या हौदात बुडून मृत्यू झाला. वेद शहाणे असं दुर्दैवी मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.  शहरातील कोकणवाडीतील अ‍ॅड. गणेश शहाणे यांचा मुलगा वेद हा आज सकाळी अंगणात खेळत होता. गेल्या आठवडाभरापासून शहाणे निवासजवळ असलेला पाण्याचा हौद भरलेला नव्हता.

आज सकाळी नळाला पाणी आल्याने हौदाचे झाकण उघडून त्यात पाणी भरण्याचे काम सुरु होते. पाण्याने हौद भरल्यानंतर त्याचे झाकण लावले जाणार होते. मात्र, त्यापूर्वीच वेद हा अंगणात खेळता-खेळता हौदाजवळ आला. हौदाच्या पाण्यात डोकावत असतानाच अचानक तोल गेल्याने तो बुडाला. बराचवेळ झाला तरी वेद दिसत नसल्याचे पाहून कुटुंबियांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली.

तेव्हा तो हौदात बुडाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वेदचा मृतदेह हौदातून बाहेर काढण्यात आला. या घटनेची नोंद वेदांतनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2018 8:33 pm

Web Title: water tank child drowning
टॅग : Child
Next Stories
1 धक्कादायक : एकतर्फी प्रेमातून जिवलग मित्रानेच केली मित्राची गळा आवळून हत्या
2 महावितरणमध्ये आठ महिन्यांत १३२ जणांचे निलंबन
3 पंतप्रधान सिंचन योजनेतील प्रकल्पांना वाळूची अडचण
Just Now!
X