महाराष्ट्रात करोना चाचण्या कमी केल्याने आपण काय गमावले आणि काय कमावले? असा प्रश्न उपस्थित करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याचं उत्तरही दिलं आहे.

महाराष्ट्रातील करोना संसर्गाचा दर अगदी सुरुवातीला जो ६ ते ७ टक्के होता.. जून पर्यंत तो दर २३ ते २४ टक्के झाला. याचाच अर्थ १०० चाचण्यांमधून २४ जणांना करोना. मुंबईत संसर्गाचा दर २१ ते २७ टक्क्यांवर स्थिरावलेला. चाचण्याची संख्या अतिशय कमी झाली आहे. १ ते १९ जुलैच्या दरम्यानची सरासरी काढली तर ५ हजार ५०० चाचण्या रोज. महाराष्ट्र आणि मुंबईतील करोना बळींची संख्या दररोज सरासरी तेवढीच. नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आणि चाचण्यांची संख्या वाढवल्यानंतर ही स्थिती सुधारली. नवी दिल्लीतल्या संसर्गाचा दर हा ३० ते ३५ टक्क्यांवरु ६ टक्क्यांवर आला आहे. ज्यामुळे करोना बळींच्या संख्येत घसरण झाली आहे. तरीही चाचण्यांची संख्या दररोज कायम आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

आता तरी जागे व्हा, मोठ्या प्रमाणात चाचण्यांना पर्याय नाहीच
कोरोनावर मात करण्याचा, रूग्णसंख्या कमी करण्याचा आणि राज्यातील नागरिकांचे मृत्यू रोखण्याचा एकमात्र उपाय म्हणजे अधिकाधिक चाचण्या, संशयितांचे विलगीकरण आणि इतरांची सुरक्षा