14 August 2020

News Flash

राष्ट्रवादीची निवड का केली, अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी सांगितलं कारण…

...म्हणून निवडला राष्ट्रवादी पक्ष

अभिनेत्री प्रिया बेर्डे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राजकारणात प्रवेश करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच निवड का केली? त्यामागे काय कारणं आहेत, ते प्रिया बेर्डे यांनी सांगितलं. “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कलेची जाण आहे, कलाकारांची कदर आहे. त्यांचा प्रचंड मोठा अनुभव आहे. त्यांनी कला, नाटय क्षेत्रातील अनेकांना मदतीचा हात दिला आहे” असे प्रिया बेर्डे यांनी सांगितलं. त्या टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

“मला कलाकारांबद्दल तळमळ वाटतेय. कलाकार तंत्रज्ञानसाठी काम करायचं आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादीचं पाठबळ मिळत असेल तर निश्चित काम करायला आवडेल” असे प्रिया बेर्डे यांनी सांगितलं. अभिनेत्री की, नेता या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, “मी स्वत:ला कधीही नेता म्हणवणार नाही. मीच नाही, माया जाधव आम्ही सगळेच मिळून एकत्र काम करणार आहोत.

” विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात प्रवेश करताय अशी चर्चा आहे, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, “असा विचारही माझ्या डोक्यात नाही. मला तळागाळातून काम करायचं आहे. तालुका जिल्ह्यांमध्ये फिरायचं आहे. लोककलावंत, तमाशा कलावंतांचे समस्या जाणून घ्यायच्या आहेत” असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 3:35 pm

Web Title: why choose ncp to entry in politics priya berde answers dmp 82
Next Stories
1 शरद पवारांच्या मुलाखतीबद्दल संजय राऊत म्हणतात… “ही मुलाखत ऐतिहासिक ठरेल”
2 अंतर्विरोध, मतभेद हे शब्द महाविकास आघाडीच्या डिक्शनरीत नाहीत, राऊतांचं फडणवीसांना उत्तर
3 १२ आमदारांचं प्रकरण नेमकं काय? काय आहे त्यामागे राजकारण? संजय राऊत यांनी केलं स्पष्ट
Just Now!
X