जिल्हय़ातील दोन्ही लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवारी संपली. नगर लोकसभा मतदारसंघात एकूण १९ इच्छुकांनी ३७ अर्ज तर शिर्डी मतदारसंघात २४ इच्छुकांनी ३८ अर्ज दाखल केले आहेत. उद्या (गुरुवार) या उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे.
लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कवडे (नगर) व रवींद्र जगताप (शिर्डी) यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. बुधवारी शेवटच्या दिवशी नगर मतदारसंघात ११ इच्छुकांनी २१ तर शिर्डी मतदारसंघात १६ इच्छुकांनी २१ अर्ज दाखल केले. आज अर्ज दाखल केलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये दीपाली तथा सोफिया जहांगीर सय्यद (नगर- आम आदमी पक्ष), योगेश घोलप (शिर्डी- शिवसेना व अपक्ष), सदाशिव लोखंडे (शिर्डी- शिवसेना) यांचा समावेश आहे.
उद्या (गुरुवारी) नगरलाच दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार असून उद्यापासूनच उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. दि. २९पर्यंत ही मुदत आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कवडे यांनी सांगितले, की आचारसंहिताभंगाच्या १२ तक्रारी जिल्हय़ात दाखल झाल्या आहेत. त्यातील काहींची चौकशी करून त्या निकाली काढण्यात आल्या असून काहींची चौकशी सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून समाजकंटकांकडून आतापर्यंत एकूण २२ अनधिकृत शस्त्रे जप्त करण्यात आली असून त्यात ९ पिस्तुले व ९ तलवारींचा समावेश आहे. शस्त्रास्त्रांचे १ हजार २०० शस्त्र परवाने त्यांच्या शस्त्रांसह जमा करून घेण्यात आले असून अजूनही सुमारे ८०० परवाने जमा करायचे आहेत. ८८८ लोकांना प्रतिबंधात्मक नोटिसा तर २ हजार ५४१ लोकांना वॉरंट बजावण्यात आले असून, अजूनही ९७१ लोकांना वॉरंट बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती कवडे यांनी दिली.
उमेदवारी अर्जाचा तपशील
नगर मतदारसंघ- राजीव राजळे (राष्ट्रवादी), अजय बारस्कर (बहुजन मुक्ती पार्टी), संभाजी धोंडे, दिलीप गांधी (भाजप), शिवाजीराव डमाळे (भारतीय नौजवान पक्ष), अनिल घनवट (आम आदमी पक्ष व अपक्ष), शिवाजी नाकाडे (अपक्ष), रामदास ढमाले (अपक्ष), दीपाली तथा सोफिया जहांगीर सय्यद (आम आदमी पक्ष), किसन काकडे (बहुजन समाज पार्टी), अनिल ओहळ (बहुजन समाज पार्टी), विकास देशमुख (अपक्ष), संभाजीराव बोरुडे (बहुजन मुक्ती पार्टी), शेख अब्बास संदलभाई (अपक्ष), पेत्रस गवारे (भारिप बहुजन समाज पक्ष), बी. जी. कोळसे (अपक्ष), लक्ष्मण सोनाळे (अपक्ष) आणि पोपट फुले (महाराष्ट्र परिवर्तन सेना).
शिर्डी मतदारसंघ- भाऊसाहेब वाकचौरे (काँग्रेस), संतोष रोहम (बहुजन मुक्ती पार्टी), दशरथ बाळू (अपक्ष), गंगाधर वाघ (अपक्ष), सतीश रणदिवे (अपक्ष), अशोक गायकवाड (अपक्ष व शिवसेना), संदीप घोलप (अपक्ष), महेंद्र शिंदे (बहुजन समाज पार्टी), माधव त्रिभुवन (बहुजन समाज पार्टी), रवींद्र शेंडे (अपक्ष), नितीन उदमले (आम आदमी पार्टी), पोपट सरोदे (लोकभारती), विजय पवार (द लोक पार्टी ऑफ इंडिया), विजय गायकवाड (अपक्ष), योगेश घोलप (शिवसेना व अपक्ष), चंद्रकांत काळोखे (अपक्ष), सुरेश आरणे (अपक्ष), सयाजी खरात (आम आदमी पार्टी), रघुनाथ मकासरे (आम आदमी पार्टी), सदाशिव लोखंडे (शिवसेना), विजयराव खाजेकर (समाजवादी पार्टी), उद्धवराव गायकवाड (अपक्ष), राजू वाघमारे (अपक्ष), रमेश कांबळे (हिंदुस्थान जनता पार्टी).
संग्रहित लेख, दिनांक 27th Mar 2014 रोजी प्रकाशित
नगरला १९, शिर्डीत २४ इच्छुकांचे अर्ज
जिल्हय़ातील दोन्ही लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवारी संपली. नगर लोकसभा मतदारसंघात एकूण १९ इच्छुकांनी ३७ अर्ज तर शिर्डी मतदारसंघात २४ इच्छुकांनी ३८ अर्ज दाखल केले आहेत. उद्या (गुरुवार) या उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे.

First published on: 27-03-2014 at 03:35 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Willing nomination files in nagar 19 and shirdi