News Flash

गुप्तांगावर केमिकल प्रयोगाने पतीला मारण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

पत्नीने पतीच्या गुप्तांगावर केमिकलचा प्रयोग करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पत्नीने पतीच्या गुप्तांगावर केमिकलचा प्रयोग करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. केमिकल प्रयोगाचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर पतीनेच पोलीस स्थानक गाठून पत्नीविरोधात तक्रार दाखल केली.

तक्रारदार पती लष्करात असून काही दिवसांच्या सुट्टीवर ते घरी आले होते. त्यावेळी ही घटना घडली. नगर तालुका पोलिसांनी फिर्यादीची पत्नी व तिचा साथीदार सतीश संपत डमरे याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. नगर तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र पवार यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.

शरीरसंबंधांपूर्वी फिर्यादी पतीने पत्नीने दिलेली क्रिम गुप्तांगाला लावली. या केमिलकच्या क्रिममुळे पतीच्या गुप्तांगाला काही दिवसांनी इजा झाली. फिर्यादी पतीने याप्रकरावरून आपल्याला मारण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार नगर तालुका पोलिसांकडे दाखल केली. नगर तालुका पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून पत्नी आणि डमरेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 1:54 pm

Web Title: women try to kill husbund by chemical experiment
Next Stories
1 मलकापूरमध्ये ट्रकवर आदळली पोलिसांची कार; ४ ठार, ३ जखमी
2 18 वर्षांनी फेसबुकवर भेटला प्रियकर, भेटायला गेली असता केला बलात्कार
3 मराठा आरक्षणासंदर्भात उत्तर देण्यासाठी राज्य सरकारला 18 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
Just Now!
X