करोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर त्याचा संबंधित आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण होणार अशी भिती वर्तवली जात होती. ती भिती आता खरी होताना दिसत आहे. राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर, बेड्स यांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता पुण्यात देखील ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्याची एक घटना समोर आली आहे. पुण्यातील योग मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. हॉस्पिटलमधील डॉक्टर अभिजीत दरक यांनीच ही माहिती दिल्यामुळे ऑक्सिजन तुटवड्याचं भीषण वास्तव समोर येऊ लागलं आहे. दरम्याना, रुग्णलयात गेल्या २ दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचं देखील डॉ. अभिजीत दरक यांनी सांगितलं आहे.

 

A case has been registered against a minor in connection with the death of a student in a municipal school
महापालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
pune, young engineer girl , overcomes a rare disorder, Treatment of Gartner, Duct Cyst, Marsupialization Procedure, rare disease to girl, rare disease pune, doctor, pune news, marathi news,
अभियंता तरूणीची दुर्मीळ विकारावर मात! मार्सपियलायझेशन प्रक्रियेद्वारे गार्टनर्स डक्ट सिस्टवर उपचार
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
ससूनमध्ये नेमकं काय घडलं? उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू नव्हे तर दुसरेच कारण

२ दिवसांपासून रुग्णालयात तुटवडा

योग हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. यामध्ये डॉ. अभिजीत दरक यानी एएनआयशी बोलताना याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. “ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गेल्या २ दिवसांपासून आम्ही लिक्विड ऑक्सिजनच्या तुडवड्यामुळे त्रस्त आहोत. सध्या रुग्णालयात ११ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आणि आमच्याकडे आत्ता फक्त तासभर पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा आहे”, असं डॉ. दरक यांनी सांगितल्याची माहिती एएनआयनं ४ वाजून १२ मिनिटांनी दिली आहे.

 

Maharashtra Lockdown : नियमावलीमध्ये नवे बदल! आता ‘या’ वेळेतच मिळणार किराणा, भाजीपाला!

पुरवठा आला, तरी ३-४ तासच पुरेल!

दरम्यान, डॉ. दरक यांनी दिलेल्या माहितीनुसार, योग हॉस्पिटलमध्ये १४ आयसीयू बेड आणि २३ ऑक्सिजन बेड आहेत. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी २० ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्याचं आश्वासन योग हॉस्पिटलला दिलं होतं. मात्र, रुग्णालय प्रशासनाला हा ऑक्सिजनचा पुरवठा नेमका कधी होईल, याची कोणतीही खात्री नाही. शिवाय, हे २० सिलेंडर आल्यानंतर देखील तो ऑक्सिजन फक्त पुढचे ३ ते ४ तास पुरेल, असं देखील डॉ. दरक यांनी सांगितलं आहे.

“गेल्या वर्षभरापासून आम्ही ५३ बेडचं कोविड सेंटर चालवतो आहोत. गेल्या २ दिवसांमध्ये आम्हाला ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवला आहे. आम्ही गेल्या २ दिवसांत कसाबसा ऑक्सिजनचा पुरवठा सुरू ठेवला. पण आता ऑक्सिजन सिलेंडर कुठेही उपलब्ध होत नाहीयेत. आम्हाला किमान व्हेंटिलेटरवर असलेले आमचे रुग्ण दुसरीकडे शिफ्ट करावे लागणार आहेत”, असं देखील दरक यांनी सांगितलं आहे.