News Flash

हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीत आढळला तरुणीचा मृतदेह

पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

woman doctor suicide, suicide, pune, suicide,marathi news
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पुण्याच्या हिंजवडीमधील इन्फोसिस कंपनीच्या कार्यालयात एका तरुणीचा मृतदेह आढळला आहे. मृतावस्थेत सापडलेली तरुणी इन्फोसिसमध्येच काम करत होती. मृत तरुणीचे नाव रसीला राजू ओपी असल्याचे समजते आहे. मृत तरुणी मूळची केरळची रहिवासी होती.

हिंजवडीच्या फेज २ मध्ये असलेल्या इन्फोसिसच्या कार्यालयात रविवारी रात्री उशिरा तरुणीचा मृतदेह आढळला. ‘मृत तरुणीचे नाव रसीला राजू ओपी आहे. ही तरुणी इन्फोसिसमध्ये काम करत होती,’ अशी माहिती हिंजवडी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस आयुक्त वैशाली माने यांनी दिली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2017 11:50 pm

Web Title: young girl dead body found in infosys office in hinjawadi it park
Next Stories
1 नाशिक महापालिका निवडणुकीसाठी २२६ इच्छुकांचे ऑनलाईन अर्ज
2 ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा उद्या नाशिकला भेट देणार; राज ठाकरेदेखील उपस्थित राहणार
3 धुळ्यात जळीतकांड; समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यास कारमध्ये जाळले
Just Now!
X