आज सर्वत्र विधानसभेचे मोठ्या उत्साहात मतदान सुरू आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये देखील लोक मतदान करण्यास घराबाहेर पडत आहेत, दरम्यान मतदान करण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अब्दुल रहीम नूरमहम्मद शेख असं या ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. ते नेहमी मतदान कऱण्यासाठी बारामती ते भोसरी प्रवास करत असत. मात्र दुर्दैवाने त्यांचं निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल रहीम नूर मोहम्मद शेख काही वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होते. “आज दुपारी मयत अब्दुल रहीम हे मतदान करण्यासाठी कुटुंबासोबत भोसरी येथील महात्मा फुले शाळेत आले होते. तेव्हा त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने महानगर पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान काही वेळाने मृत्यू झाला”, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अब्दुल रहीम गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरशी आजाराने पीडित होते. शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला.

गडचिरोली – मतदान केंद्रावर भोवळ येऊन शिक्षकाचा मृत्यू
बापू पांडू गावडे (45) राहणार दोड्डी टोला, एटापल्ली हे बेस कॅम्प वरून रविवारी मतदान केंद्राकडे जात असताना फिट येऊन खाली कोसळले. त्यानंतर त्यांना एटापल्ली येथे रुग्णालयात भरती करण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्‍यांच्या कुटुंबासह त्यांना चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. सोमवारी पहाटे एक वाजून 30 मिनिटांनी त्यांचे दवाखान्यात निधन झाले.