महाराष्ट्राच्या जनतेने जनादेश महायुतीलाच दिला आहे. लवकरात लवकर महायुतीचं सरकार स्थापन व्हावं अशी महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे. मात्र सरकार स्थापनेला उशीर लागतो आहे. त्याच संदर्भात आम्ही राज्यपालांशी चर्चा केली असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांना त्यांनी राजभवनाबाहेर माहिती दिली. त्यावेळी ते बोलत होते. सरकार स्थापन होण्यासाठी विलंब लागला आहे. याचसंदर्भात राज्यपालांशी चर्चा केली. आता पुढचं पुढे ठरवू असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासोबत गिरीश महाजन, आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवार हे तिघेही उपस्थित होते.

विधानसभा निवडणूक निकाल लागून १३ दिवस उलटून गेले आहेत. तरीही सत्ता स्थापनेचा पेच सुटलेला नाही. भाजपाला १०५ जागा मिळाल्या आहेत तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. सत्तेत अर्धा वाटा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद या दोन मागण्यांमुळे शिवसेना आणि भाजपात चर्चा थांबली आहे. आता ही कोंडी कशी फुटणार  आणि सरकार कधी स्थापन होणार हे प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.