14 December 2019

News Flash

कसबा गणपतीचे दर्शन घेऊन राज ठाकरेंनी फोडला प्रचाराचा नारळ

यावेळी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि शहरातील मनसेचे उमेदवार देखील उपस्थित होते.

पावसामुळे पुण्यात बुधवारी होणारी सभा सभा रद्द झाल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला आहे. यावेळी चिरंजीव अमित ठाकरे आणि पुण्यातून विधानसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले सर्व मनसेचे उमेदवार सोबत होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात बुधवारी जाहीर सभा आयोजित करण्यात केली होती. या सभेच्या माध्यमातून मनसेचा प्रचाराचा नारळ फोडला जाणार होता. मात्र काल सभेच्या दरम्यान मुसळधार झालेल्या पावसामुळे, राज ठाकरे यांना सभा रद्द करण्याची वेळ आली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहण्यास मिळाली. सभा रद्द झाल्याने, आज सकाळी पुणे शहराचे ग्राम दैवत कसबा गणपतीची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरती केली. गणरायाचे दर्शन आणि आरतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. यावेळी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि शहरातील मनसेचे उमेदवार देखील उपस्थित होते.

कसबा गणपतीला राज ठाकरे आले असताना, रूपाली पाटील अनुपस्थित

कसबा विधानसभा मतदार संघातून मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील या इच्छुक होत्या. मात्र त्यांच्या ऐवजी शहर अध्यक्ष अजय शिंदे यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे नाराज होत्या आणि या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची देखील त्यांनी भेट घेतल्याचे बोलले जात होते. या सर्व घडामोडी घडत असताना, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कसबा विधानसभा मतदार संघात असलेल्या पुणे शहराचे ग्राम दैवत कसबा गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी शहरातील मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र याच मतदार संघातून डावलण्यात आल्याने रूपाली पाटील, यावेळी अनुपस्थिती राहिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

First Published on October 10, 2019 12:20 pm

Web Title: maharshtra election 2019 raj thackeray kasaba ganpati took blessing start election campaigning nck 90
Just Now!
X