सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत ऐन निवडणुकीत बिघाडी निर्माण झाली आहे. सोलापुरातील दोन मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमेंकाविरोधात उमेदवारी दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके यांना राष्ट्रवादीने परस्पर उमेदवारी दिल्याचा राग म्हणून काँग्रेसने शिवाजीराव काळुंगे यांना भालकेंविरोधात उभे केले. याच खेळीला प्रत्युत्तर म्हणून शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने जुबेर बागवान यांची उमेदवारी दाखल केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या आदेशाने सोलापुरात हे पाऊल उचलण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष संतोष पवार म्हणाले, शहर मतदारसंघात राष्ट्रवादीला मानणारा वर्ग आहे. जुबेर बागवान यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी मुस्लिम समाजातील विविध संघटनांनी केली होती. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या ७ तारखेपर्यंत दोन्ही पक्षांमधील बंडोबांची नाराजी दूर करण्यास पक्ष नेतृत्वाला कसरत करावी लागणार आहे.

Gulab Barde, Maharashtra Kesari,
दिंडोरीत वंचितकडून ‘महाराष्ट्र केसरी’ मैदानात
Ramtek Lok Sabha, Ramtek, mahayuti Ramtek,
मतदारसंघाचा आढावा : रामटेक; नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलल्याचा फायदा कोणाला ?
Congress, shetkari kamgar paksh
रायगडमधील पारंपरिक प्रतिस्पर्धी निवडणुकीच्या आखाड्यापासून दूर
Congress, shetkari kamgar paksh
रायगडमधील पारंपरिक प्रतिस्पर्धी निवडणुकीच्या आखाड्यापासून दूर

आणखी वाचा- पंढरपुरात तिरंगी लढत; परिचारकांचे पारडे जड

पुण्यातही आघाडीत बिघाडी –
पर्वती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आबा बागूल यांनी शक्तीप्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याची स्थिती दिसून येत आहे. त्यानंतर शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांनीसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला