महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यानं नवं सरकार स्थापन झालं. परंतु तीनच दिवसांमध्ये हे सरकार कोसळलं. प्रथम अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. तसंच राज्यात आता महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे हे जवळपास स्पष्ट झालं आहे. मनसेने महाविकास आघाडीबद्दल अद्याप कोणतीही भूमिका घेतली नव्हती. परंतु आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकऱ्याचं प्रश्न आपण विधीमंडळात मांडणार आहोत. तसंच बुलेट ट्रेन आणि नाणार सारख्या प्रकल्पांना आपला विरोध कायम राहिल, असंही त्यांनी बोलताना सांगितलं.

आणखी वाचा- राज ठाकरे लावणार का ‘दादू’च्या शपथविधी सोहळ्याला हजेरी?

PSI Sanjay Sonawane, nagpur,
पीएसआय संजय सोनवणे म्हणतात, “मी पोलीस आयुक्तांना ओळखत नाही,” नेमका काय आहे प्रकार? जाणून घ्या…
Uddhav Thackeray
“शिवसेनेला नकली सेना म्हणणाऱ्यांना…”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर थेट प्रहार; म्हणाले “इंजिनाची चाकं…”
Sanjay Raut, Raju Shetty
…तर संजय राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आले असते का ?राजू शेट्टी यांचा प्रतिप्रश्न
Electoral bond, Electoral bond scam
निवडणूक रोखे घोटाळा म्हणजे ‘मोदीगेट’; स्वतंत्र आयोगातर्फे चौकशीची मागणी

आता महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार आहे. त्यात मनसेला स्थान मिळेल का असा सवाल राजू पाटील यांना करण्यात आला. त्यावर उत्तर देताना याचा निर्णय राज ठाकरे घेतील, असंही ते म्हणाले. दरम्यान, निवडणुकीपूर्वी मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसनं काही ठिकाणी मनसेला मदत केली होती. परंतु मनसेला त्या ठिकाणी यश मिळालं नव्हतं. परंतु आता मनसे महाआघाडीबाबत काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल.

महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यानं नवं सरकार स्थापन झालं. परंतु तीनच दिवसांमध्ये हे सरकार कोसळलं. प्रथम अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील हे आता निश्चित झालं आहे.