नुकतेच विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समोरील उमेदवाराला तब्बस १ लाख ६५ हजारांपेक्षा अधिक मतांनी धुळ चारली. त्यानंतर त्यावरून आता पोस्टरबाजीला उधाण आलं आहे. ‘आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल,’ अशा आशयाचे पोस्टर्स बारामतीमध्ये लावण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे १ लाख ६५ हजार २६५ मतांनी विजयी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी ढाण्या वाघ संबोधलेल्या भाजपाच्या गोपीनाथ पडळकरांसह सर्वच उमेदवारांचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला होता. तसंच त्यांच्यासमोरील सर्वच उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त झालं होतं. त्यानंतर अजित पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानाजवळ त्यांच्या अभिनंदनाचं बॅनर्स लावण्यात आले. त्यावरील आगळावेगळा मजकूर सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. ‘आमच्या येथे डिपॉझिट जप्त करुन मिळेल’ असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला आहे.

Buldhana Lok Sabha constituency, independent candidate, won, history of buldhana lok sabha seat, lok sabha 2024, election 2024, marathi news, buldhana news,
बुलढाणा: सात दशकात अपक्षांनी विजयाचा गुलाल उधळलाच नाही! यंदा चमत्कार घडणार का? चर्चेला उधाण
Eknath Shindes Shiv Senas claim on Bhiwandi Lok Sabha
भिवंडी लोकसभेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा, कल्याणचे पडसाद भिवंडीत
The wealth of Congress Lok Sabha candidate Vikas Thackeray family has increased
नागपुरात गडकरींविरुद्ध लढणाऱ्या उमेदवाराच्या कुटुंबाची संपत्ती २ कोटी ९१ लाखांनी वाढली…
BJP leaders in Gadchiroli
आयारामांची संख्या वाढल्याने भाजप नेते अस्वस्थ; भविष्यातील राजकारण धोक्यात…

निवडणुकांपूर्वीच अजित पवार यांनी तडकाफडकी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. तसंच ते काही वेळासाठी अचानक सर्वांच्या संपर्काबाहेर गेले होते. त्यानंतर अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत आपण बारामतीत आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवल्याचं म्हटलं होतं. तसंच निकालानंतरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. निकालानंतर रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. परंतु त्यावेळीही अजित पवार उपस्थित नव्हते. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीदरम्यानही अजित पवार अनुपस्थित होते.