News Flash

थोडयाच वेळात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद, फोन न उचलण्यावर काय बोलणार?

मुख्यमंत्र्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केल्यानंतर आता शिवसेनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

विधानसभा निवडणुकीचे लागल्यानंतर इतक्या दिवसात सरकार स्थापन का होऊ शकले नाही ? त्यामागे काय कारणे होती? ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहयाद्री अतिथिगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींचा खुलासा केल्यानंतर आता शिवसेनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

५०-५० आणि मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचा निर्णय झाला नव्हता. उद्धव ठाकरे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यामध्ये सुद्धा असा काही निर्णय झाला नव्हता हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ५०-५० आणि मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचा निर्णय झाला होता असे म्हटले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यावर काय बोलणार? याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. मी स्वत: मातोश्रीवर फोन केले पण उद्धव ठाकरेंनी ते फोन उचलले नाहीत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2019 5:30 pm

Web Title: shivsena party chief uddhav thackray address press confrance dmp 82
Next Stories
1 दररोज बोलणाऱ्या संजय राऊतांबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले….
2 निकालाच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी केलेले ते विधान आमच्यासाठी धक्कादायक होते: फडणवीस
3 50:50 मुख्यमंत्री कधीही निर्णय झाला नाही – फडणवीस
Just Now!
X