‘छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि आईवडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..’ अशा शब्दांत ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने गुरुवारी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभर रंगलेला सत्तेच्या सापशिडीचा खेळ संपला. राज्यात अखेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. मात्र त्यानंतर आता ट्विटवर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवण्याची मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे.

#DevendraFadanvisForPM हा हॅशटॅगही देशभरामध्ये ट्रेण्ड करण्यात आला आहे. हा हॅशटॅग वापरून तीन हजारहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत.

 

भाजपाने २३ नोव्हेंबरच्या सकाळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मदतीने सत्तास्थापनेचा दावा केला होता. शुक्रवारी २२ नोव्हेंबरला संध्याकाळपर्यंत उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील यावर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी शिक्कामोर्बत केल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यानंतर शनिवारी सकाळी अचानक भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र भाजपाला देत भाजपाला सरकारला पाठिंबा असल्याचे जाहीर केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार हा पक्षाचा निर्णय नसून अजित पवार यांचा निर्णय असल्याचे स्पष्ट केलं होतं. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने या सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करुन बहुमत नसताना भाजपाने महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्याचा दावा केला होता. यावर रविवारी आणि सोमावारी सुनावणी झाल्यानंतर मंगळवारी न्यायालयाने २७ नोव्हेंबर रोजी खुल्या पद्धतीने मतदान घेऊन बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर लगेचच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अनेक दिवस राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होते. अखेर त्याला यश आल्याने अजित पवारांनी राजीनामा दिला. अजित पवार यांनी पाठिंबा दर्शवण्यास असमर्थता दाखवल्याने बहुमत नसल्याचे सांगत फडणवीस यांनाही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ७२ तासांमध्ये राजीनामा दिला. यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. याच सत्ता नाट्यानंतर आता फडणवीस यांच्या समर्थकांनी त्यांना थेट पंतप्रधानपद करण्यासाठी मोहिम सुरु केली आहे.

मात्र या हॅशटॅगवरुन नेटकऱ्यांनी फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांची खिल्ली उडवली आहे.

आयटी सेलवाले

मोदींची पहिली प्रतिक्रिया

अमित शाह

पगार द्या

हे तर असं झालं

जाऊ द्या

हा ट्रेण्ड पाहून

एवढा मोठा

काय

मोदींची प्रतिक्रिया

एकीकडे विरोधकांनी भाजपा समर्थकांची खिल्ली उडवली असतानाच हा ट्रेण्ड नक्की कोणी केला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र शुक्रवारी साडेपाचच्या सुमारास ट्विटवर हा हॅशटॅग ट्विटवर तिसऱ्या क्रमांकावर ट्रेण्ड होत होता.