|| प्रबोध देशपांडे

Khadakwasla, Baramati, Ajit Pawar,
‘बारामती’साठी खडकवासल्यात मोर्चेबांधणी, महायुतीचा फौजफाटा सात दिवस राखीव ठेवा; अजित पवारांची सूचना
Amravati , ok sabha election 2024, Constituency Overview, navneet rana, bacchu kadu, BJP
मतदारसंघाचा आढावा : अमरावती; जनतेच्या न्यायालयातील लढाई नवनीत राणांसाठी अग्निदिव्य ठरणार
Ramtek Lok Sabha, Ramtek, mahayuti Ramtek,
मतदारसंघाचा आढावा : रामटेक; नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलल्याचा फायदा कोणाला ?
BSP, Nagpur, Ramtek, BSP Nagpur,
नागपूर, रामटेकमध्ये बसपाच्या मतांना ओहोटी, गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत…

बुलढाणा जिल्हय़ातील विधानसभेच्या सात मतदारसंघात होत असलेल्या तुल्यबळ लढतीमुळे निवडणुकीत रंगत आली आहे. सोपी वाटणारी निवडणूक प्रस्थापितांना चांगलाच घाम फोडत आहे. बुलढाण्यात महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याने येथे चौरंगी लढत असून, इतर सहा मतदारसंघात दुरंगी, तिरंगी लढत होत आहे. जिल्हय़ात जातीय समीकरण महत्त्वपूर्ण ठरण्याची चिन्हे आहेत. ते जुळवण्याची कसरत उमेदवारांना करावी लागेल.

जिल्हय़ात प्रस्थापितांपुढे नव्या दमाच्या उमेदवारांनी मोठे आव्हान उभे केले. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात काटय़ाचा सामाना  दिसतो. जागावाटप व उमेदवारीसाठी महायुतीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत रस्सीखेच चालली. युतीमध्ये भाजप चार, तर शिवसेना तीन जागांवर लढत आहे. आघाडीमध्ये सिंदखेड राजा राष्ट्रवादीला देण्यात आला असून, उर्वरित सर्व मतदारसंघात काँग्रेसने तगडे उमेदवार दिले. जातीय समीकरण लक्षात घेऊन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले. त्यामुळे विद्यमान दिग्गजांना जागा टिकवण्यासाठी चांगलीच मेहनत घ्यावी लागत आहे. युतीमध्ये बुलढाणा मतदारसंघावर भाजप व शिवसेनेने दावा ठोकला होता. अखेर हा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने भाजपचे योगेंद्र गोडे यांनी बंडाचा पवित्रा घेतला. शिवसेनेने गायकवाडांना उमेदवारी दिल्याने माजी आमदार विजयराज शिंदे यांनी ‘वंचित’चे सिलिंडर हाती घेतले. त्यामुळे मतविभाजन अटळ आहे. एमआयएमनेही येथे उमेदवार दिला. काँग्रेसकडून विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळ रिंगणात आहेत. बुलढाण्यात चुरशीची चौरंगी लढत आहे.

खामगाव मतदारसंघात लक्षवेधी लढत होत आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी नकार दिल्याने खामगावातील समीकरण बदलले. सानंदांनी आपले राजकीय वजन वापरून महाआघाडीच्या उमेदवारीची माळ ज्ञानेश्वर गणेश पाटील यांच्या गळय़ात टाकली. भाजपकडून अ‍ॅड.आकाश फुंडकर पुन्हा एकदा रिंगणात आहेत. वंचित आघाडीकडून शरद वसतकार यांना उमेदवारी देण्यात आली. मतदारसंघात पाटील व कुणबी समाजाचे जातीय समीकरण निर्माण होऊन मतविभाजन होण्याची दाट शक्यता आहे. भाजपकडून मतदारसंघातील विकास, तर विरोधकांकडून रखडलेले प्रश्न व समस्यांभोवती प्रचार केंद्रीत आहे. जळगाव जामोदमध्ये भाजपचे कॅबिनेट मंत्री डॉ. संजय कुटे, काँग्रेसच्या स्वाती वाकेकर व वंचित आघाडीत सामना आहे. या मतदारसंघात चारच उमेदवार रिंगणात आहेत. माळी व पाटील समाजाची भूमिका निर्णायक ठरेल. मतदारसंघातील खारपाणपट्टय़ासह शेगाव विकास आराखडा व इतरही मुद्दे प्रचारात येत आहेत. मलकापूरमध्ये भाजपचे चैनसुख संचेती आणि काँग्रेसचे राजेश एकडे यांच्यात सरळ लढत आहे. मतदारसंघातील नाराजी ‘कॅच’ करण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न होत आहे. एकेकाळी भाजपचा गड असलेला चिखली मतदारसंघ परत मिळवण्यासाठी महायुतीचे जोरदार प्रयत्न आहेत. त्यामुळे भाजपाध्यक्ष अमित शहा यांची सभा घेऊन वातावरण निर्मिती केली. मात्र, भाजपसाठी चिखलीचे मैदान सोपे नाही. चिखलीमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार राहुल बोंद्रे व भाजपच्या श्वेता महाले यांच्यात दुरंगी लढत आहे. मध्यंतरी राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराच्या वावडय़ा उठल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या अडचणीतही भर पडल्याचे दिसून येते. लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर डॉ. राजेंद्र शिंगणे सिंदखेड राजामधून पुन्हा एकदा विधानसभेच्या आखाडय़ात उतरले आहेत. त्यांच्यापुढे शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. शशिकांत खेडेकर असून, दोघांमध्येच थेट लढत होत आहे. मेहकरमध्ये शिवसेनेचे संजय रायमुलकर विरुद्ध काँग्रेसचे अनंत वानखेडे यांच्यात सामना आहे. बुलढाणा जिल्हय़ात महायुतीच्या मोठय़ा नेत्यांनी प्रचाराचे मैदान गाजवले. तुलनेत महाआघाडीच्या राज्याच्या नेत्यांवरच जिल्हय़ातील प्रचाराची धुरा आहे. जिल्हय़ातील सर्वच मतदारसंघात अटीतटीची लढत होत असल्याचे चित्र दिसून येते.

प्रचारात आनंद सागरचा मुद्दा

प्रचार मोहिमेत विविध मुद्दे समोर येत आहेत. शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थान ‘श्रीं’च्या भक्तांचा आस्थेचा विषय. संस्थानकडून आनंद सागर हे पर्यटन केंद्र सुरू करण्यात आले. आक्षेपामुळे काही महिन्यांपूर्वी ते बंद करण्यात आले. त्याचा मोठा फटका पर्यटन व्यवसायाला बसला. मध्यंतरी शेगाव संस्थानमध्येही हस्तक्षेप झाल्याची चर्चा होती. आनंदसागर बंद  पडणे, शेगाव संस्थानमधील हस्तक्षेप आदी मुद्यांवरून विरोधकांनी भाजपला घेरले आहे.

जिल्हय़ात प्रस्थापितांपुढे नव्या दमाच्या उमेदवारांनी मोठे आव्हान उभे केले. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात काटय़ाचा सामाना  दिसतो. जागावाटप व उमेदवारीसाठी महायुतीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत रस्सीखेच चालली. जातीय समीकरण लक्षात घेऊन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले. त्यामुळे विद्यमान दिग्गजांना जागा टिकवण्यासाठी चांगलीच मेहनत घ्यावी लागत आहे.